‘एबीआयएल’तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ कोटी रूपयांची मदत ; तर पुणे जिल्हा प्रशासनास आपत्ती व्यवस्थापनासाठी ५० लाखांचा निधी

पुणे – येथील अविनाश भोसले समूहाने ( एबीआयएल ) कोरोना विरुद्धच्या लढयासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रुपये १ कोटी इतकी मदत केली आहे. त्याबरोबर पुणे जिल्हा प्रशासनास आपत्ती व्यवस्थापना करीता ५० लाखांचा निधी देखील उपलब्ध करून दिला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा उपचार पद्धती उपयुक्त असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर उपचार पद्धती पुण्यातील ससून रुग्णालयात उपलब्ध व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यामध्ये अत्यंत महत्त्वाचे असलेले वैद्यकीय उपकरण म्हणजे प्लाझ्मा सेपरेटर मशीन हे होय. हे मशिन घेण्यासाठी एबीआयएलच्या वतीने २८ लाख इतकी आर्थिक मदत करण्यात आली आहे.

Original Source

Post by ABIL Group

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *